बांबूचे पर्यावरणपूरक व बहुउपयोगी महत्व लक्षात त्यांना प्राथमिक स्तरापासून शालेय विद्यार्थ्यांना बांबू लागवड, संवर्धन, त्याचे विविध उपयोग याबाबत शिक्षण मिळावे. तसेच शालेय अभ्यासक्रमात बांबूविषयक प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि शैक्षणिक उपक्रमांचा समावेश केल्यास पर्यावरण जागरूक पिढी घडण्यास मदत होईल, असा विश्वासही या परिषदेच्या चर्चासत्रात तज्ज्ञांनी व्यक्त केला.
या चर्चासत्रात जेनेटिक्स अँड ट्री इम्प्रुव्हमेंट, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (FRI), देहराडूनचे प्रमुख डॉ. अजय ठाकूर, ग्रामीण विकास व नियोजन विभाग, नागालँड विद्यापीठ, दीमापूरचे प्राध्यापक व प्रमुख डॉ. जयंत चौधरी , इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्लीचे प्राध्यापक डॉ. सुप्रतिक गुप्ता, पंजाब विद्यापीठ, चंदीगडच्या प्राध्यापक डॉ. निर्मला चोंगथाम, फॉरेस्ट जेनेटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभाग, केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (KFRI) चे डॉ. ई. एम. मुरलीधरन ,बांबू आणि कॅन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, अगरतळा, त्रिपुराचे प्रमुख डॉ. अभिनव कांत, CEPT विद्यापीठ, अहमदाबादचे प्राध्यापक प्रा. आर. संकल्प , आर्किटेक्चर व डिझाईन शाळा, मणिपाल विद्यापीठ, जयपूर च्या प्राध्यापक व संचालक डॉ. माधुरा यादव, यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग, IIT गुवाहाटीच्या प्राध्यापक डॉ. पूनम कुमारी, वैज्ञानिक, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे (CBRI), डॉ. किशोर कुलकर्णी, सेंटर फॉर बांबू डेव्हलपमेंट, IPRITI, बेंगळुरू चे प्रमुख डॉ. विपिन चावला, इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पराग आर. नेमाडे, MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुणेचे संचालक डॉ. नचिकेत ठाकूर यांच्यासह प्रा. चारुचंद्र कोरडे यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment