Saturday, 20 September 2025

बांबूसंदर्भात भारतात संशोधन व विकास मोठ्या प्रमाणात झाल्यास भारत हा बांबू उत्पादनामध्ये अग्रसेर

 बांबूसंदर्भात भारतात संशोधन व विकास मोठ्या प्रमाणात झाल्यास भारत हा बांबू उत्पादनामध्ये अग्रसेर होईलअसे श्री. ओरोस्कर यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरवठा साखळी व बाजारपेठ निर्माण करण्यावरही भर देण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी सांगितली.

मुथ्था इंडस्ट्रीचे अनिल मुथ्था म्हणालेबांबू उद्योगाला सुरुवातीच्या टप्प्यात सरकारी मदतीचे साह्य मिळाले पाहिजे. सरकारने खरेदीमध्ये बांबू फर्निचरला अधिक संधी देण्याची गरज आहे. बांबू उद्योगासाठी मशिनरी प्रामुख्याने चीनमध्ये मिळतात. परंतु स्थानिक पातळीवर देखील यंत्रांची निर्मिती झाली पाहिजे. तसेच दर्जेदार कच्चा माल मिळणे आवश्यक आहे.

अभिषेक गुप्ता यांनी बांबूच्या उद्योग विकासाबरोबरच संशोधन आणि तंत्रज्ञानाला देखील महत्व देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

बांबूला भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) दिला आणि बौद्धिक संपदा म्हणून घोषित केल्यास स्थानिक पातळीवरील उद्योजकव्यावसायिक यांना लाभ होईलअसे श्री. गोळे यांनी सांगितले.

ज्युरियन सस्टेनिब्लिटी कंपनीचे संस्थापक कृणाल नेगांधी व जॅक्सन ग्रुपचे चंदन गोसावी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. या सत्राचे परिषदेचा समारोप झाला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi