Saturday, 6 September 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे “सर्वांना सोबत घेऊन चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत

 श्री. पवार म्हणाले कीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे सर्वांना सोबत घेऊन चला या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम आहे. त्याचे प्रमुख घटक म्हणजे सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणेपंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणेजलसमृद्ध व हरित गावांची निर्मितीमनरेगा व इतर योजनांचे अभिसरण साधणेग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करणेउपजीविका व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे हे आहेत.

आज प्रत्येक गावाला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. तो योग्य ठिकाणी खर्च करणेगावांच्या गरजांनुसार प्राधान्य ठरविणे आणि कामांचा दर्जा उंचावणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. पारदर्शकतेसह जनतेच्या विश्वासास पात्र राहून ग्रामविकासाची कामे झाली पाहिजेत. प्रत्येक गावाने स्वावलंबीआत्मनिर्भर आणि आदर्श ग्राम म्हणून घडविण्याची संधी या अभियानातून मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi