राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते
71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित
मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ 2’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव
नवी दिल्ली, दि. 23 : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आले. या मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता आणि वैविध्य सिद्ध करत राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली. ‘शामची आई’, ‘नाळ 2’ आणि ‘जिप्सी’ या चित्रपटांनी मराठी सिनेमाची श्रीमंती अधोरेखित करत विविध श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले. वर्ष 2023 मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
या केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, , माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि निवड समितीचे सदस्य आशुतोष गोवारीकर, पी.शेषाद्री, गोपालकृष्ण पाय व्यासपीठावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment