Thursday, 28 August 2025

शहरी विकास ही केवळ इमारती उभारण्याची बाब नाही, तर ती सामाजिक आणि आर्थिक समृद्धी घडवण्याची प्रक्रिया आहे

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीशहरी विकास ही केवळ इमारती उभारण्याची बाब नाहीतर ती सामाजिक आणि आर्थिक समृद्धी घडवण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच प्रत्येक प्रकल्पामागे दूरगामी विचार आणि मजबूत आर्थिक रचना असली पाहिजेअसेही त्यांनी सांगितले.

यावेळी बैठकीस जागतिक बँक टास्क फोर्सचे अबेद खालीलमित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्तानगर विकासाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता उपस्थित होते.

MUINFRA अंतर्गत नवीन फंड रचना तयार करण्यात आली असूनतिच्या माध्यमातून शहरांना पायाभूत व नागरी सुविधा उभारण्यासाठी दीर्घकालीन भांडवल उपलब्ध करून देता येणार आहे. पूल बाँड्सक्रेडिट एन्हासमेंट यांच्या माध्यमातून कमर्शियल मार्केटमधून निधी उभारता येणार आहे. यामुळे प्रकल्पांचे आर्थिक नियोजन अधिक ठोस आणि शाश्वत होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi