Monday, 18 August 2025

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

 कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहरमुंबई उपनगरठाणेरत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रात्रौ ११.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५  रात्रौ ८.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटर तसेच पालघररायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि. १९ ऑगस्ट २०२५  ८.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५  रात्रौ ८.३० २०  पर्यंत ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत  समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याकडून दि. १७ ते दि. २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्याचाबत सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi