Friday, 29 August 2025

विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित ऑनलाइन सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर

 विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित ऑनलाइन सेवा

‘आपले सरकार’ पोर्टलवर

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर,तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकरउच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडेसहसचिव संतोष खोरगडेदूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.विद्यापीठाशी संबंधित ऑनलाईन सेवांबाबत सादरीकरण अनुप बाणाईत यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi