Tuesday, 26 August 2025

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला

 कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, "मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सवम्हणून घोषित केला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियेने ही 'नमो एक्सप्रेसकोकणात रवाना करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही विशेष गाडी सोडण्यात आली असूनथेट खेडला पहिला थांबा घेणार आहे. त्यानंतर चिपळूणरत्नागिरीराजापूरवैभववाडीकणकवलीसिंधुदुर्गकुडाळ आणि सावंतवाडी या शेवटच्या स्थानकावर थांबणार आहे. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी ‘नमो एक्सप्रेस’ आयोजित करून अतिशय चांगली सुविधा दिली असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi