गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन
'नमो एक्सप्रेस' कोकणाकडे रवाना
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने
गणेशोत्सव विशेष रेल्वे
मुंबई दि. २५ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.
कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. कोकणात जाणाऱ्या २ हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली.
No comments:
Post a Comment