Saturday, 19 July 2025

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन ८ डिसेंबर रोजी नागपुरात

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन ८ डिसेंबर रोजी नागपुरात

 

            मुंबईदि. १८ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

*विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास कामकाज*

विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास ४८ मिनिट कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९०.२० टक्के होतीतर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.२३ टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित १४ शासकीय विधेयके मांडण्यात आली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५ असून ५ सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi