Saturday, 19 July 2025

राजमाता जिजाऊ मासाहेब स्मारकाच्या जतन, संवर्धनासह विकासकामांना आवश्यक निधी देणार

 राजमाता जिजाऊ मासाहेब स्मारकाच्या जतन,

संवर्धनासह विकासकामांना आवश्यक निधी देणार

-पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक

 

मुंबईदि.१८ :- राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या पाचाड ( जि. रायगड) आणि सिंदखेडराजा ( जि. बुलढाणा) येथील स्मारकांचे जतन संवर्धन आणि विकासकामांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच भारतीय पुरातत्त्व विभागाकडून अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहेअसे पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य सिद्धार्थ खरात यांनी पाचाड ( जि. रायगड) आणि सिंदखेडराजा ( जि. बुलढाणा) येथील राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या स्मारक कामासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी चर्चेत सदस्य अभिजीत पाटील यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्री. नाईक यांनी सांगितलेकी पाचाड येथील राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे समाधीस्थळ व तेथील राजवाडा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत संरक्षित स्मारक आहे. त्या ठिकाणच्या संवर्धनाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्व विभागाची असल्यामुळे त्या ठिकाणी कोणतीही सुविधा त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येत नाही. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पाचाड येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, रायगड यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विकासकामांना आवश्यक परवानग्या घेऊन ती काम जात आहेत.

सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे जन्मस्थळ हे राज्य पुरातत्व  व वस्तुसंग्रहालय संचालनालय अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक आहे. या ठिकाणच्या पाच राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन आणि दुरुस्तीसाठी १२.९६ कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यामार्फत जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत या स्मारकांच्या जतनसंवर्धन व दुरुस्तीसाठी ९.४९ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सिंदखेडराजा येथील स्मारकांचे दुरुस्तीचे काम आराखड्यानुसार होत असून हे काम लवकरच पूर्ण केले जाईल. या कामांच्या समन्वयासाठी सांस्कृतिक कार्यपर्यटननगरविकासवननियोजनग्रामीण विकास आणि महसूल विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येईलअसेही पर्यटन राज्यमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi