Thursday, 24 July 2025

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही

 https://electors.eci.gov.in किंवा ECINet मोबाईल ॲपवर ऑनलाइन अर्ज भरून किंवा छापील फॉर्म भरून व स्वाक्षरी करून कुटुंबीयांच्या माध्यमातून बीएलओ (BLO) कडे पाठवू शकतात किंवा छापील अर्ज भरून व स्वाक्षरी करून व्हॉट्सॲपवर बीएलओ च्या मोबाईलवर पाठवू शकतात.बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाहीआणि

कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही

– भारत निवडणूक आयोगाचा उद्देश

मुंबईदि.23 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे कीबिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

या टप्प्यात खालील बाबी स्पष्ट झाल्या आहेत :

९८.०१% मतदारांचा कव्हरेज पूर्ण;

२० लाख मृत मतदारांची नोंद;

२८ लाख कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार;

७ लाख मतदार दोन ठिकाणी नोंदलेले आढळले;

१ लाख मतदार अपात्र किंवा शोधता न आलेले;

१५ लाख मतदारांनी आपले फॉर्म परत केलेले नाहीत आणि

७.१७ कोटी (९०.८९%) मतदार फॉर्म प्राप्त आणि डिजिटल स्वरूपात रूपांतरित

राज्यातील १२ प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या सुमारे १.५ लाख बूथ लेव्हल एजंट्स (BLA) यांना २० जुलै रोजी चुकून समाविष्ट केलेल्या मतदारांची आणि फॉर्म न भरलेल्या मतदारांची यादी देण्यात आली आहे.

बिहारमधून तात्पुरते स्थलांतरित झालेलेपण इतरत्र नोंदणी न केलेले मतदार खालील पद्धतीने फॉर्म भरू शकतात :

https://electors.eci.gov.in किंवा ECINet मोबाईल ॲपवर ऑनलाइन अर्ज भरून किंवा छापील फॉर्म भरून व स्वाक्षरी करून कुटुंबीयांच्या माध्यमातून बीएलओ (BLO) कडे पाठवू शकतात किंवा छापील अर्ज भरून व स्वाक्षरी करून व्हॉट्सॲपवर बीएलओ च्या मोबाईलवर पाठवू शकतात.

हा अर्ज सादर केलेल्या मतदारांची नावे मसुदा मतदार यादीत समाविष्ट केली जातील. याची पुष्टी व माहिती https://electors.eci.gov.in/home/enumFormTrack# या संकेतस्थळावर करता येईल. फॉर्म भरलेल्या आणि मोबाइल क्रमांक नमूद केलेल्या मतदारांना आयोगाकडून एसएमएस (SMS) संदेश पाठविण्यात आले आहेत.

१ ऑगस्ट २०२५ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. जर या यादीत काही त्रुटी आढळल्यातर कोणत्याही मतदाराला किंवा राजकीय पक्षाला १ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपत्ती नोंदवता येईल. तसेचकोणत्याही पात्र व्यक्तीचे नाव यादीत न आढळल्यास त्यांनी दावा दाखल करता येईलअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi