Thursday, 19 June 2025

शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश कामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश

 शिंपोरा येथील पुलाची उभारणी तातडीने करावी

सभापती प्रा.राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश

कामाबाबत तातडीने चौकशी करुन कारवाईचे निर्देश

 

मुंबई, दि. १८ :- कर्जत तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) खेड-मानेवाडी ते शिंपोरा रस्त्यावरील पूल या भागातील शेतकरीनागरिकविद्यार्थी यांना रहदारीसाठी महत्वाचा आहे. हा पूल अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या भागातील नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या  परिसरातील नागरिकांना या मार्गावरून सुरळीत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी हा पूल नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आठ दिवसात तत्काळ सादर करावाअसे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनमुंबई येथील बैठकीत दिले.

सभापती प्रा. राम शिंदे आणि ग्रामविकास मंत्री श्री.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत विधान भवनातील दालनात पूल उभारण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री.एकनाथ डवलेएम.एम.जी.एस.वाय. चे सचिव सतिश चिखलीकरसहसचिव के.जी.वळवीउप सचिव प्रशांत पाटील तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशियामुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारीसोलापूर पुनर्वसन विभाग उजनी अधीक्षक अभियंता श्री. सालेप्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे श्री.भदाणे उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणालेपूल वाहून गेल्याच्या प्रकरणाची आठ दिवसात चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आठ दिवसात नवीन, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट पुल बांधणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात यावानव्या पुलास लोकभावनेस अनुसरुन ग्रामविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मौजे खेड-मानेवाडी ते शिंपोरा ता.कर्जतजि.अहिल्यानगर या रस्त्यावरील नांदणी नदीवरील पूल अवकाळी पाऊस व  अतिवृष्टीने २५ मे२०२५ रोजी वाहून गेला. त्यानंतर ९ जून२०२५ रोजी सभापती प्रा. शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेबद्दल सभापती प्रा. शिंदे आणि ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

या पुलाच्या बांधकामाची चौकशी करावीयासाठी नेमलेल्या समितीने आठ दिवसांत आपला अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावीअसे निर्देश यावेळी देण्यात आले. लोकभावनेची दखल घेऊन पुलाची उभारणी आता तातडीने होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहेअसेही सभापती प्रा.शिंदे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi