Saturday, 21 June 2025

आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम

 आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत

 

रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम

                                                                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          मुंबईदि. 21: महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहीन्यांच्या सहा रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या रेडिओवरील संगीत ऐकणेगाने लिहीणे आदी छंदाविषयी मनमोकळा संवाद साधला. आपल्या आयुष्यातील रेडिओविषयक प्रसंगांचे वर्णन त्यांनी संवादाद्वारे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले. रेडिओचे महत्व पूर्वापासुन असून आजही ते अबाधीत असल्याचे सांगत रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम आहेअशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओचे महत्व अधोरेखीत केले. 

 

          मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआमच्या लहानपणी दिवसाची सुरूवात सकाळी रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. विविध भारती रेडिओ वाहिनीवर सकाळी येणारी गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळता आले. शासन दरबारी रेडिओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी काही तरी केले पाहिजेहा विचार सातत्याने होता. या पुरस्कार सोहळा आयोजनातून त्याचे समाधान लाभत आहे. रेडिओवर कार्यक्रम सुरू असताना माणूस दिसत नाहीपण सचित्र दर्शन शब्दांमधून घडत असतेअसे विचार मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.

 

          जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात रेडिओ जॉकी सिद्धूअक्कीअर्चनाब्रजेशभूषणसपना भट यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे समन्वयन हेनल मेहता यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसलेसांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेसंचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

 

            संगीत हे मानवामध्ये संवेदनशीलता आणत असून तणावमुक्तीचे कार्य करते. प्रवासात किंवा तातडीच्या समस्या येवून मनस्थिती बिघडत असल्यास हमखास संगीत ऐकावे. त्यामुळे मन शांत होऊन विचार क्षमता विकसित होते. रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाहीअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. रेडिओचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाहीतर संवादाचेही माध्यम होऊ शकतेहे त्यांनी दाखवून दिलेअशा शब्दात पुन्हा एकदा रेडिओचे महत्व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विषद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi