Saturday, 21 June 2025

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर

 रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर असून अतिवृष्टीमुळे दापोली, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये झाड कोसळून आणि भिंत पडून खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १७३ किमी ३०/६०० चिपळूण तालुक्यातील अंजवेल- रानवेल- पलटणे-श्रृंगरतली- कोटलूक- आबोली- भडगाव चारवेली रास्ता खचला असून  या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने कळविले आहे.

 

          राज्यात मागील २४ तासांमध्ये (२१ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ३४ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७.९ मिमीकोल्हापूर २३.७ मिमीरायगड जिल्ह्यात १२.४ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ११.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

 

          राज्यात कालपासून आज २१ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ७.९रायगड १२.४रत्नागिरी ३४,  सिंधुदुर्ग २७.९पालघर ११.४नाशिक ७.९धुळे ०.१नंदुरबार १.३जळगाव ०.२अहिल्यानगर ०.२पुणे ४.२सोलापूर ०.४,  सातारा १०.६,  सांगली ६.१,  कोल्हापूर २३.७छत्रपती संभाजीनगर ०.९जालना ०.४,  लातूर ०.५धाराशिव ३.२नांदेड ०.१,  परभणी ०.३हिंगोली २.५बुलढाणा ०.३अकोला ०.४वाशिम ०.१ अमरावती ०.१यवतमाळ ०.३वर्धा ०.३नागपूर ०.१भंडारा ०.७गोंदिया ०.५चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

          पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यूजालना जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यूठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi