Friday, 20 June 2025

योग संगम” कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना

 योग संगम कार्यक्रमातून महाराष्ट्रात योग आणि हरित उपक्रमांना चालना

          यावर्षी ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असूनत्यानिमित्ताने १० प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेयात योग संगम हे एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहेअशी माहिती संस्थेचे प्रभारी सहाक संचालक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली.

          या कार्यक्रमाअंतर्गत हरित योग आणि योगा पार्क या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वृक्षारोपणालाही विशेष प्राधान्य देण्यात आले असूनकेवळ जे.एन.पी.ए.मध्ये १ लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे. राज्यभरात योगप्रसारासाठी व्याख्यानेशिबिरे आणि जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.

          आर.आर.ए.पी. संस्थेने या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन करत योगाची व्यापक घडी घातली असून, ‘योग संगम’ हा केवळ एक कार्यक्रम नसूननिरोगी भारताच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहेअसे मत संस्थेचे सहायक संचालक डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi