Friday, 20 June 2025

नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा लवकर मंजूर करावा

 नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा लवकर मंजूर करावा – वन मंत्री गणेश नाईक

          नवी मुंबईतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत. घणसोली येथे खुला रंगमंच कला अकादमी मिनी थिएटर बांधणेमराठी भाषा भवन उभारणीला गती देणेघणसोली येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीड संकूल उभारणेतसेच विकास शुल्कामध्ये महानगरापालिकेलाही हिस्सा मिळावा. परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळाचे नाव बदलून श्री शिव गोरक्षनाथ आर्थिक विकास महामंडळ करणेनागरी सुविधांसाठी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करावेतआदी विविध मागण्या वन मंत्री श्री. नाईक यांनी यावेळी केल्या.

          खारघर ते नेरूळ जेट्टी सागरी मार्ग बेलापूरमध्ये न आणता तो सेक्टर ११ मधून विमानतळाच्या दिशेला न्यावातसेच नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकर मजूर करावाअशी मागणी मंत्री श्री. नाईक यांनी यावेळी केली.

          या बैठकीस नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदेसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलयांच्यासह नगरविकास विभागग्रामविकास विभागवन विभागउद्योग विभागएमआयडीसीमेरी टाईम बोर्ड आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi