समितीच्या कार्यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग
संमेलनात समितीच्या कार्यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढविणे, प्रभावी डाटा विश्लेषण, समितीमधील सदस्यांनी कमीत कमी संख्या निश्चित करणे यावर निर्णय झाले. संमेलनात ६ प्रस्ताव संमत पारीत करण्यात आले. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अंदाजांवर प्रभावी नियंत्रण व पारदर्शकतेला प्राधान्य देणारी कार्यप्रणाली करणे, समितीमध्ये अनुभव व ज्ञानाचे आदान – प्रदान करण्यासाठी संस्थात्मक प्रणाली विकसित करणे, समितीने केलेल्या शिफारशी, सादर केलेले अहवाल, केलेली कार्यवाही यांचा जनसामान्यांवर पडलेल्या परिणामांचा प्रभावी प्रचार करणे, समितीच्या अर्थसंकल्पीय अंदाज व प्रशासकीय खर्चाच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ट कालावधी, समिती सदस्यांच्या कार्यकुशलतेसाठी प्रभावी कार्यप्रणाली तयार करणे, राज्य व केंद्राच्या समन्वयातून वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करणे आदींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. बिर्ला म्हणाले, ब्राझील येथे ११ वे ब्रिक्स संमेलन पार पडले. या संमेलनात १० देश सहभागी झाले, या संमेलनात पहलगाम आतंकवादी हल्याचा निषेध करण्यात आला. यामध्ये सहभागी देशांनी आतंकवादाविरूद्ध एकत्रित लढण्याचा मानसही व्यक्त केला. १८ व्या लोकसभेचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून या वर्षात ४ सत्र झाले असून या सत्रांमध्ये १०४ टक्के कामकाज झाले. लोकसभेच्या कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करीत २२ भाषांमध्ये संसदीय कामकाजाचे भाषांतर करण्यात आले आहे. सर्व सदस्यांना कामकाज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेलाही संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. संसदेचे कामकाज पेपरलेस करण्यात आले आहे.
संसदेच्या कामकाजाची ‘डिजीटल लायब्ररी’ करण्यात आली आहे. तसेच संसदेतील ग्रंथालयही डिजीटल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. यावेळी राज्यसभा उपसभापती हरीवंश, अंदाज समिती अध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल यांनीही संमेलनातील विविध सत्रांबाबत माहिती दिली.
०००००
No comments:
Post a Comment