प्लास्टिक मुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी
सांस्कृतिक कार्य विभाग सहकार्य करणार - मंत्री ॲड.आशिष शेलार
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले की, पर्यावरण विभागाने महापर्यावरण हे अप्लिकेशन सुरू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसित, संपन्न, समृद्ध व दिशादर्शक कामे करणारे महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा हा देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
पर्यावरण हा विषय उपदेश नसून आत्मचिंतनाचा, आत्मबोधाचा, गुणवत्ता प्रसाराचा विषय आहे. पर्यावरण रक्षणाची भूमिका संत ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा मांडली. ज्ञानेश्वरांनी पर्यावरण पोषणाचा विचार मांडला. हा विचार गावागावत पोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभागाबरोबर काम करेल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना - जयश्री भोज
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राज्यात वातावरणीय बदलामुळे होणारे विविध परिणाम लक्षात घेता, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच विविध उपाययोजना राबवत आहे. वातावरणीय कृती आराखड्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य वातावरणीय कृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. याशिवाय माझी वसुंधरा अभियान, राज्याचे परिसंस्था आधारित अनुकूलन धोरण, मानवनिर्मित देवराई व घनवने निर्माण करणे, कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष, सर्क्युलर इकॉनॉमी धोरण, विद्युत वाहन धोरण आदीच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment