Monday, 30 June 2025

राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे या मध्यवर्ती संकल्पनेवर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

 राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे या मध्यवर्ती संकल्पनेवर

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

 

            मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत यशवंतराव चव्हाण केंद्रमुंबई येथे 19 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. 'राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षेही या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती

            विश्वविख्यात थोर सांख्यिकी तज्ञ व भारताच्या आधुनिक सांख्यिकीचे जनक डॉ. प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा  जन्मदिन 29 जून हा दिवस सन 2007 पासून दरवर्षी संपूर्ण देशभर राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकी संस्था असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे दि. 29 जून 2025 रोजी यशवंतराव चव्हाण केंद्रात साजरा करण्यात आला.

            या कार्यक्रमास अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, मुंबई  आयआयटीचे प्रा. सतिश अग्नीहोत्री, भारतीय सांख्यिकी सेवेचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपरानीनियोजन विभागाचे सह सचिव विवेक गायकवाडअर्थ व सांख्यिकी संचालक कृष्णा फिरके, शशिकांत मुळे तसेच नियोजन विभागअर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी/ कर्मचारीनियोजन क्षेत्राशी निगडित संशोधक आदी उपस्थित होते.  

            अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी करीत असलेले सांख्यिकीचे काम हे राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फारच उपयुक्त असल्याचे नमूद केले. देशात प्रथम महाराष्ट्रात सबस्टेट लेव्हलवर ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात येणार आहे संचालनालयामार्फत प्रकाशित होणारे विविध अहवाल केंद्र शासनाच्या टाईमलाईन बरोबर प्रकाशित करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच पुढील कालावधीत राज्य व्यवसाय नोंदवही तयार करणे व माहितीचे आदान प्रदान ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi