Monday, 30 June 2025

सांख्यिकी संचालनालयामार्फत यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे 19 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

 राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षे या मध्यवर्ती संकल्पनेवर

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

 

            मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन 29 जून हा सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत यशवंतराव चव्हाण केंद्रमुंबई येथे 19 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला. 'राष्ट्रीय नमुना पाहणीची 75 वर्षेही या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती

            विश्वविख्यात थोर सांख्यिकी तज्ञ व भारताच्या आधुनिक सांख्यिकीचे जनक डॉ. प्रशांत चंद्र महालनोबिस यांचा  जन्मदिन 29 जून हा दिवस सन 2007 पासून दरवर्षी संपूर्ण देशभर राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणून साजरा केला जातो. राज्य शासनाची प्रमुख सांख्यिकी संस्था असलेल्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे दि. 29 जून 2025 रोजी यशवंतराव चव्हाण केंद्रात साजरा करण्यात आला.

            या कार्यक्रमास अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार, मुंबई  आयआयटीचे प्रा. सतिश अग्नीहोत्री, भारतीय सांख्यिकी सेवेचे सेवानिवृत्त अतिरिक्त महासंचालक अशोक कुमार टोपरानीनियोजन विभागाचे सह सचिव विवेक गायकवाडअर्थ व सांख्यिकी संचालक कृष्णा फिरके, शशिकांत मुळे तसेच नियोजन विभागअर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी/ कर्मचारीनियोजन क्षेत्राशी निगडित संशोधक आदी उपस्थित होते.  

            अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी करीत असलेले सांख्यिकीचे काम हे राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फारच उपयुक्त असल्याचे नमूद केले. देशात प्रथम महाराष्ट्रात सबस्टेट लेव्हलवर ग्राहक किंमती निर्देशांक परिगणित करण्यात येणार आहे संचालनालयामार्फत प्रकाशित होणारे विविध अहवाल केंद्र शासनाच्या टाईमलाईन बरोबर प्रकाशित करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच पुढील कालावधीत राज्य व्यवसाय नोंदवही तयार करणे व माहितीचे आदान प्रदान ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचे सांगितले.

सांख्यिकीय माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीचे विश्लेषण व धोरणकर्त्यांना तत्काळ आकलन होईल अशा स्वरूपाचे व्हिजुअल सादरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.  त्याचप्रमाणे माहितीच्या आधारे शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेणाऱ्याशी संवाद असणे आवश्यक असल्याचे मत  प्रा. अग्नीहोत्री यांनी व्यक्त केले.

            मागील 75 वर्षाच्या कालावधीमध्ये सांख्यिकीय कार्यालयाकडून ज्या ज्या पाहण्या घेतल्या व त्याद्वारे झालेले साध्य त्याचप्रमाणे भविष्यात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलित करण्याबाबत तसेच अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे मत श्री. टोपरानी यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi