Thursday, 22 May 2025

रोहिणी ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा,,धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

 रोहिणी ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा

 

 ऑनलाईन सेवा ग्रामस्थांना घरबसल्या कशाप्रकारे देता येतील याचा विचार रोहिणी ग्रामपंचायतीने केला आहे़. त्यासाठी विविध माध्यमशासनाचे अॅकपपोर्टल यांचा वापर केला आहे़. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला राज्य शासनाकडून महाऑनलाईन आयडी प्राप्त झाला आहे़त्याद्वारे साधारण 956 अन्य सुविधा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविल्या जात आहेत़. त्याचप्रमाणे रोहिणी ग्रामपंचायतीत महिला व बालकल्याणशिक्षणआरोग्यपशुसंवर्धन या विभागातंर्गत ऑनलाईन प्रणालीचा उपयोग सेवा वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे़. या ग्रामपंचायतीने निर्णयमेरी ग्रामपंचायतचॅट जीपीटी याआधारे ग्रामस्थांचा सहभाग घेतला आहे़. तसेच ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या लिंकयुटयुबफेसबुकइन्स्टाग्रॉम या माध्यमातून देखील शेअर केले आहेत़. रोहिणी हे गाव 100 टक्के आदिवासी गाव असतांना देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़. शाळाआरोग्यअंगणवाडीकृषी आदींमध्ये ई-गर्व्हनन्स प्रणालीचा वापर केला जात आहे़.

 

            अनुसूचित क्षेत्राअंतर्गत ‘पेसा’ गावातील रोहिणी ग्रामपंचायतीने डिजिटल सेवा प्रभावीपणे राबवल्या आहेत. नागरिक सेवांमध्ये पारदर्शकताकार्यक्षमता आणि सुलभता लक्षात घेऊनग्रामपंचायतींकडून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.  ही सुविधा विशेषत: दुर्गमआदिवासी भागांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ग्रामपंचायतीने त्यांच्या वेबसाइटवर एक लिंक दिली असून ज्याद्वारे नागरिक घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेदरम्यान ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहेज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण होते. दोन्ही पोर्टल वापरकर्ता-अनुकूल,  मोबाईल फ्रेंडलीनागरिक-केंद्रित आहेत. या उपक्रमातून आदिवासी पेसा गाव देखील डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकार करू शकते हे रोहिणी गावाने दाखवून दिले आहे़. रोहिणी ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन माध्यमातून जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया एक प्रभावी डिजिटल सेवा आहे.

 

            रोहिणी ग्रामपंचायतीकडून मृत्यू प्रमाणपत्रांची सेवा ग्रामपंचायतस्तरावर स्वयंचलितपणे आणि पूर्णपणे ऑनलाइन माध्यमातून दिली जात आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत विहित केलेल्या ७ कामकाजाच्या दिवसांच्या कालावधीत नागरिकांना ही सेवा प्रदान केली जात आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरत्यांना ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष उपस्थित न राहता त्यांच्या व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे मृत्यू प्रमाणपत्र मिळते़ रोहिणी ग्रामपंचायतीद्वारे मृत्यू प्रमाणपत्रांची डिजिटल सेवा केवळ नागरिक-केंद्रित आणि पारदर्शक नाही तर ग्रामीण पातळीवर डिजिटल कार्यक्षमता आणि तांत्रिक स्वावलंबनाचे एक उत्तम उदाहरण देखील आहे. ही प्रणाली गावपातळीवर एक प्रभावी सार्वजनिक सेवा वितरण मॉडेल म्हणून पाहिले जात आहे.

 

            रोहिणी ग्रामपंचायतीचा ई-गव्हर्नन्स ग्रामपंचायत म्हणून राज्य शासनाकडून पुरस्कार देवून नुकताच सन्मान करण्यात आला. या पुरस्काराकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडेउप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरेगटविकास अधिकारी प्रदीप पवारविस्तार अधिकारी संजय पवार यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे रोहिणी ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ़ आनंद पावराग्रामसेवक आर. क़े. क़ुमावत यांनी सांगितले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi