Thursday, 22 May 2025

शेतकरी समाधानी तर राज्य समाधानी -

 शेतकरी समाधानी तर राज्य समाधानी - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेसध्याच्या काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असूनवाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर फार्म ऑफ द फ्युचरसारख्या नव्या कल्पनांच्या अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत आहे. महाराष्ट्रात ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतांवर या नवकल्पनांची अंमलबजावणी होत असूनउत्पादनवाढीसोबत मार्केट इंटेलिजन्स आणि सप्लाय चेनच्या माध्यमातून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवनवीन संशोधनामुळे अधिक उत्पादनकमी पाणी आणि खताचा वापर शक्य झाला असूनक्रॉपिंग पॅटर्नमध्येही लवचिकता आली आहे. शेतकरी आता विविध पिकांचे चक्र बदलून अधिक उत्पादन मिळवत आहेत. सरकारकडून चांगल्या कामांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी समाधानी राहिला तर राज्य समाधानी राहीलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi