Friday, 30 May 2025

धारावीचा पुनर्विकास हे आमचं सामाजिक वचन मुंबई महानगरातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर बनविणार

 धारावीचा पुनर्विकास हे आमचं सामाजिक वचन

मुंबई महानगरातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर बनविणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 29 : मुंबई महानगरात येणाऱ्या काळात धारावी हे सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून टाकून सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे धारावी प्रतिक ठरणार आहे. सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असून जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले. काल सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकासाचा आढावा घेण्यात आला होतात्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत होते. 

राज्य सरकारच्या २० टक्के हिस्सेदारीसह आणि अदानी समूहाच्या ८० टक्के भागीदारीतला हा ₹९५,७९० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे केवळ निवासी वसाहत असणार नाहीतर  धारावीकरांच्या  जीवनशैलीत महत्त्वाचा बदल यामुळे घडणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाविषयी सांगितले.

धारावीचा पुनर्विकास म्हणजे आमचं स्वप्न नाहीतर आमचं सामाजिक वचन आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीकरांना केवळ हक्काचं घरच नाहीतर संपूर्ण नव्या जीवनशैलीत जगता येणार आहे. 

हा पुनर्विकास फक्त पायाभूत सुविधांचा नाहीतर रोजगारशिक्षणआरोग्यआणि सामाजिक सलोख्याचं मॉडेल ठरेल. हे स्मार्ट मुंबईच्या दिशेनं उचललेलं ऐतिहासिक पाऊल आहे, असेही ते म्हणाले.

धारावीचे एकूण क्षेत्रफळ २५३ हेक्टर असून यापैकी १७४ हेक्टर पुनर्विकासासाठी उपलब्ध असणार आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले कीझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प यांच्यामार्फत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला जाईल. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देशासाठी कंपनीत एनएमडीपीएलमध्ये राज्य सरकार २० टक्के व अदानी प्रॉपर्टीज ८० टक्के असे हिस्सेदार आहेत. एकूण ७२,००० युनिट्सचे पुनर्वसन होणार असून त्यात निवासी ४९,८३२औद्योगिक/व्यावसायिक १२,४५८ युनिट असतील. या प्रकल्पात संभाव्य लाभार्थी सुमारे ६ लाख असून ३८,००० चौ.मी.हून अधिक जागेत शैक्षणिक संस्थाआरोग्य केंद्रेपोलीस चौक्याअग्निशमन केंद्रबाजारपेठाग्रंथालयं अशा सुविधा निर्माण केल्या जातील, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi