Thursday, 22 May 2025

शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही

 शेतकऱ्यांना बियाणे आणि खते याचा तुटवडा भासणार नाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार

मुंबईदि. २१ : राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा आणि खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे आणि खते याचा कुठलाही तुटवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भासणार नाही. साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात घेता येईलयाचा विचार करूनच त्‍या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगाम आढावा बैठकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजलसंपदा मंत्री गिरीष महाजनकृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटेराज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालप्रधान सचिव प्रविण दराडेप्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi