Friday, 30 May 2025

भारत निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील ३७३ मतदार अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

 वृत्त क्र. 2263

भारत निवडणूक आयोगाकडून चार राज्यांतील

३७३ मतदार अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण

मुंबईदि. २९ : भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) पर्यवेक्षकांसाठीच्या आठव्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु झाले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमातील छत्तीसगडहरियाणामध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BLO, BLO पर्यवेक्षक आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना संबोधित केले.

IIIDEM येथे आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रशिक्षण बॅचमध्ये एकूण ३७३ अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून ११८मध्य प्रदेशमधून १३०छत्तीसगडमधून ९६ आणि हरियाणामधून २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांतदिल्ली येथे एकूण ३,७२० फील्ड अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ECI मार्फत घेण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले कीहे प्रशिक्षण अत्यावश्यक असूनलोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व १९५१मतदार नोंदणी नियम १९६०निवडणूक आचारसंहिता नियम १९६१ आणि वेळोवेळी आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.

या प्रशिक्षणाद्वारे सहभागी अधिकारी अंतिम मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकारी/कार्यकारी दंडाधिकारी (कलम २४(अ)लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०) व राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (कलम २४(ब)) यांच्याकडे पहिल्या व दुसऱ्या अपीलच्या तरतुदींची माहिती मिळवतील. तसेच, BLO व BLO पर्यवेक्षकांनी फिल्डमध्ये काम करताना मतदारांनाही या तरतुदींची जाणीव करून द्यावीअसेही आवाहन त्यांनी केले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) मोहिमेनंतर दि. ६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान छत्तीसगडहरियाणामध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून एकही अपील दाखल झालेले नाही.

या प्रशिक्षणाचा उद्देश सहभागी अधिकाऱ्यांना मतदार नोंदणीअर्ज प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि फिल्डमध्ये निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी याबाबत व्यावहारिक ज्ञान देणे आहे. त्यांना माहिती व तंत्रज्ञान साधनांचा वापरतसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांचे तांत्रिक प्रात्यक्षिक आणि मॉक पोल्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहेअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकानुसार कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi