प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासनः
या वर्गवारीमध्ये संकेतस्थळ सुरुः www.mahanwans.org. केंद्र शासनाशी सुसंवादः देशात सर्वोत्कृष्ट काम, स्वच्छता उपक्रमः 2449 नस्त्यांचे निंदणीकरण व वर्गीकरण पूर्ण, तक्रार निवारणः "आपले सरकार" पोर्टलवरील 96% व "PG पोर्टल "वरील 98% तक्रारींचे निराकरण, कार्यालयीन सुविधाः कार्यालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध, ई-ऑफिस प्रणालीचा वापरः 100% अमलबजावणी, प्रशिक्षण व AI वापरः सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर, CSR अंतर्गत आर्थिक सहकार्य: 30 जिल्ह्यांतील 2,33,664 लाभार्थ्यांना CSR माध्यमातून सहकार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम "सुकर जीवनमान" या अंतर्गत १०० दिवसीय महा आवास अभियानामार्फत गतिमानता व गुणवत्ता, बहुमजली इमारती, लैंड बैंक, गृहसंकुल, घरकुल मार्ट, डेमो हाऊस, सॅण्ड बैंक, कॉप शॉप, नागरी सुविधा, कॉर्पोरेट व अॅकेडेमिया सहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणाः, महाआवास पोर्टल, हेल्पलाईन, भूमिलाभ पोर्टल, "आवास मित्र" अॅप या कामांचा समावेश आहे.
कार्यप्रदर्शनामागील व्यवस्थापनाची सामूहिक ताकद
उल्लेखनीय यशामागे केवळ सांख्यिकीय प्रगती नसून, राज्यातील लाखो पात्र लाभार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण समर्पण, प्रभावी समन्वय व कार्यक्षम अंमलबजावणीमुळे ही प्रगती शक्य झाली असल्याचे ग्रामीण गृहनिर्माण संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment