Thursday, 10 April 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा

 

मुंबई, दि. १० : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाच्या निमित्ताने त्यांना भक्तिपूर्वक नमन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भगवान महावीर यांचे जन्म कल्याणक पर्व सर्वांच्या आयुष्यात सुखशांतीसमृद्धी घेऊन येवोअशी प्रार्थना करतानाच भगवान महावीर यांचे जीवन समाजाला सदैव प्रेरणा देत राहील. जगा व जगू द्या हा त्यांचा संदेश केवळ मानवतेसाठी नाही तर अखंड जीवसृष्टीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान आहे. अहिंसासत्यअस्तेयब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही त्यांनी दिलेली पंचशील तत्वे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतीलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi