Thursday, 20 March 2025

महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण; स्वीडिश कंपन्यांना धोरणात्मक पाठबळ देणार

 महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण;

स्वीडिश कंपन्यांना धोरणात्मक पाठबळ देणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत राऊंडटेबल चर्चा

 

            मुंबई, दि.19 : भारत आणि स्वीडन यांचे अनेक वर्षांचे द्विपक्षीय तसेच राजनैतिक संबंध आहेत. स्वीडिश कंपन्या गेल्या शंभर वर्षांपासून भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. याठिकाणी ज्या स्वीडिश कंपन्या उद्योग सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांना सर्व आवश्यक धोरणात्मक पाठबळ देण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे स्वीडन येथील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वीडिश कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत राऊंडटेबल चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावलमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगनमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसेबिझनेस स्वीडनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहान लार्सनस्वीडनचे उप वाणिज्यदूतस्वीडिश कंपन्यांचे मान्यवर सदस्य आणि स्वीडिश प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी कॅन्डेला कंपनी सोबत सांजस्य करार करण्यात आला.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वीडनमधील बहुतेक कंपन्या महाराष्ट्रात आधीपासून कार्यरत आहेतपण ज्या कंपन्या अद्याप येथे नाहीतत्यांचे आम्ही स्वागत करू. बिझनेस स्वीडनचे मुंबईतील नवीन कार्यालय उद्घाटन आपण करत आहात. यामुळे भारत आणि स्वीडन यांच्यातील व्यापार संबंध अधिक दृढ होण्यास  मदत होईल आणि दोन्ही देशांतील व्यावसायिक देवाणघेवाण अधिक सुलभ होईल. धोरणात्मक बाबींवर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ज्या धोरणात्मक सुधारणा आवश्यक असतीलत्यावर पूर्णतः सहकार्य करूअसे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

            महाराष्ट्र शासन हे हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रातील कंपन्यांना स्वतंत्रपणे ग्रीन पॉवर वापरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्याचा  उद्योग विभाग स्वीडिश कंपन्यासोबत काम करेल आणि आवश्यकता मदत देखील करेल.  राज्यात जलटॅक्सी सेवा सुरू करण्यास आम्ही आग्रही आहे. या सेवेवर आम्ही काही प्रमाणात काम केले आहेपण मुंबईसाठी अजून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. जलवाहतूक प्रकल्प यशस्वी ठरत आहेतपरंतु आता त्याचा आणखी विस्तार करण्याची वेळ आली आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून आम्ही जलवाहतूक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. अनेक जेट्टी बांधल्या गेल्या आहेत. या पुढाकारामुळे जलटॅक्सी सेवांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे. स्वीडिश कंपन्याच्या सहकार्याने हा उपक्रम आणखी पुढे न्यायचा आहे. जेणेकरून महाराष्ट्रात जलटॅक्सी सेवा सुरू करण्यास चालना मिळेलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. ही राऊंड टेबल चर्चा अत्यंत फलदायी झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi