Thursday, 20 March 2025

मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य बिल गेट्स यांची ग्वाही; लखपती दीदी उपक्रमातही सहभाग

 मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून महाराष्ट्राच्या डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

बिल गेट्स यांची ग्वाहीलखपती दीदी उपक्रमातही सहभाग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबिल गेट्स यांच्यादरम्यान चर्चा

            मुंबईदि. २० :- राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापकप्रख्यात उद्योजक आणि गेट्स फाऊंडेशनचे बिल गेट्स यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स तसेच गेट्स फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. गेट्स आणि मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्यकृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली.

            महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि बिल गेट्स यांची पहिल्यांदाच भेट होत असून याचा आनंद असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र परिवर्तन टप्प्यातून जात असल्याने पायाभूत सुविधाकृषीआरोग्यामध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी गेट्स फाऊंडेशने सहकार्य करावे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आरोग्य आणि कृषी क्षेत्रामध्ये करण्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यात एआयच्या वापरातून ऊसाचे दुप्पट उत्पादन घेतल्याचे उदाहरणही मुख्यमंत्र्यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi