महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता
मुंबई, दि. २७ : पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे.
पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही स्मारकांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर निधी पुणे महापालिकेला वितरीत केला जाईल. यामुळे स्मारकांच्या कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
००००
महात्मा फुले वाडा और सावित्रीबाई फुले स्मारक के विस्तारीकरण कार्य को
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की प्रशासनिक मंजूरी
मुंबई, 27 : पुणे स्थित महात्मा फुले वाडा और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले स्मारक के विस्तारीकरण के लिए भूमि अधिग्रहण और निवासियों के पुनर्वास हेतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रशासनिक मंजूरी प्रदान की है। इन कार्यों के लिए 200 करोड़ रुपये की निधि स्वीकृत की गई है। इस प्रशासनिक मंजूरी से स्मारक के विस्तारीकरण कार्यों में तेजी आएगी।
पुणे शहर में महात्मा फुले वाडा और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले स्मारक के विस्तारीकरण के लिए भूमि अधिग्रहण और निवासियों के पुनर्वास के कार्य हेतु 200 करोड़ रुपये की निधि बजट में स्वीकृत की गई है। विस्तारीकरण के तहत भूमि अधिग्रहण और पुनर्वास के बाद फुले वाडा और सावित्रीबाई फुले स्मारक को जोड़ने के लिए एक मार्ग का निर्माण किया जाएगा। इसके साथ ही, दोनों स्मारकों का संरक्षण और विकास किया जाएगा। प्रशासनिक मंजूरी के बाद, स्वीकृत निधि को पुणे नगर निगम को वितरित किया जाएगा, जिससे इन स्मारकों के कार्यों में तेजी आएगी।
0000
No comments:
Post a Comment