Thursday, 19 December 2024

आश्वासने पूर्ण होणार; योजना बंद होणार नाहीत ...महाराष्ट्र आता थांबणार नाही

 आश्वासने पूर्ण होणारयोजना बंद होणार नाहीत

...महाराष्ट्र आता थांबणार नाही

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लाडक्या बहिणींचा देय हप्ता अधिवेशनानंतर जमा होणारशेतकऱ्यांना वीज बिल नाही

 

नागपूरदि. 19 :- राज्यातील शेतकरीयुवा वर्गज्येष्ठ नागरिकवंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाहीअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईलअशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होताआजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहीलमहाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाहीअसे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक आली असून यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात 10 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिली असून यामध्ये 2 लाख 39 हजार 117 कोटींची गुंतवणूक तर 79 हजार 720 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील 47 मोठ्या प्रकल्पात 1 लाख 23 हजार 931 कोटींची गुंतवणूक होऊन 61 हजार रोजगार निर्मितीमराठवाड्यात 38 प्रकल्पात 74 हजार 646 कोटी गुंतवणूक व 41 हजार 325 रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात 136 प्रकल्पात 1 लाख 49 हजार 493 कोटींची गुंतवणूक होऊन 1 लाख 10 हजार 588 रोजगार  निर्मिती होत आहे. यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगरजालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi