Monday, 16 December 2024

लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावेमु

 लोकराज्य दुर्मिळ अंकांचे डिजिटायजेशन करावे

प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

·         विधानभवन परिसरात लोकराज्य दुर्मिळ अंक’ प्रदर्शनाचे उद्घाटन

·         मंत्रीआमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन केले कौतुक

 

नागपूरदि. 16 : ‘लोकराज्य’ चे दुर्मिळ अंक हे माहितीचा अमूल्य ठेवा असून त्याचे जतन व संवर्धन होण्याकरिता या अंकांचे डिजिटायजेशन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी विधानभवन परिसरातील लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास मंत्रीआमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन राज्याच्या गौरवशाली परंपरेच्या माहितीचा ठेवा असणाऱ्या या प्रदर्शनाचे कौतुक केले.

उद्घाटन प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) डॉ. गणेश मुळेलोकराज्यचे संपादक तथा संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळेछत्रपती संभाजीनगर विभागाचे संचालक (माहिती)  किशोर गांगुर्डेवरिष्ठ पत्रकार धर्मेंद्र जोरेनागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवारवर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवि गितेचंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी यावेळी उपस्थित होते.

महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. तसेच या दुर्मिळ अंकांचा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटायझेशन आणि अन्य आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. दुर्मिळ अंकांच्या मांडणीचे कौतुकही त्यांनी केले.

प्रदर्शनात वैविध्यपूर्ण माहितीचा ठेवा असणारे दुर्मिळ अंक

1964 पासूनचे अंक येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर आणि कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित अंकमराठी संगीत रंगभूमीडॉ. बाबासाहेब आंबेडकरमहात्मा फुलेछत्रपती शाहू महाराजयशवंतराव चव्हाणमराठवाडा विकास व सांस्कृतिक अंकस्वातंत्र्यदिन विशेषांकासह महाराष्ट्र राज्यातील महान व्यक्तीमत्वेसांस्कृतिकभौगोलिकआर्थिक असा वैविध्यपूर्ण ठेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती असणारे 150 अंक या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मान्यवरांच्या भेटी व सेल्फी स्टँडवर छायाचित्रे

        विधीमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने विधानभवन परिसरात विधानसभा व विधानपरिषद सदस्यांची लगबग होती. वाटेतच लोकराज्य दुर्मिळ अंकांचे आकर्षक प्रदर्शन दिसताच त्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी पाहणी करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदविल्या. याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी स्टँडवर पोज देऊन छायाचित्रेही काढून घेतली.

            भेट देणाऱ्यांमध्ये मंत्रीॲड. आशिष जायस्वालआमदार सर्वश्री प्रविण दरेकरचित्रा वाघबाबुसिंग राठोडअबु आझमीश्रीजया चव्हाणसुहास बाबरदेवराव भोंगळे यांचा समावेश आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहलवनविभागाचे उपसचिव विवेक होशिंगउपमुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव धिरज अभंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रदर्शनास भेट दिली. अधिवेशन कालावधीमध्ये दररोज सकाळी 9 वाजता पासून हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध राहणार आहे.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi