Monday, 11 November 2024

जीवनातील दिशा बदलणारे "स्वामी दत्ताअवधूत" ह्यांचे अमूल्य ग्रंथ म्हणजे "मानवी जीवनातील गूढ रहस्य".*

 *जीवनातील दिशा बदलणारे "स्वामी दत्ताअवधूत" ह्यांचे अमूल्य ग्रंथ म्हणजे "मानवी जीवनातील गूढ रहस्य".*


डोंबिवलीच्या ग्रंथालयातून पहिल्यांदाच मी ह्याचा पहिला भाग वाचण्यासाठी घेतला. अर्धे पुस्तक वाचून झाल्यानंतर मला त्या लेखकाविषयी आणि त्यांच्या लेखनाविषयी खूपच आवड निर्माण झाली. आपल्या जीवनात असेही काही गूढ रहस्य असतात.अदृश्य शक्तींचा वावर असतो. त्यांचा परिणाम काहींना होतो काहींना होत नाही. ध्यानसाधना, जप, तप या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम. याची संपूर्ण सविस्तर माहिती यात मांडली होती.


हे पुस्तक वाचताना मला खूप छान वाटत होते अजून पुढे काय असेल याचे आतुरता मनात वाटू लागली. त्यामुळे मी लगेच च ह्याची पुढील दोन भाग विकत घेतले.


पुस्तका विषयी माहिती:-


हे ऐक असे पुस्तक आहे की यात त्यांनी आत्मसिद्धी, ध्यान साधना व भारतीय गुढ विद्या . याचे सविस्तर ज्ञान त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचविले आहे. गुढ विद्ये विषयी माहिती देणारा हा ग्रंथ या ग्रंथात अनेक साधना कशा कराव्यात याची माहिती दिली असून याशिवाय योगातील रहस्यमय भाग प्रथमच प्रकाशित करण्यात आला.


या पुस्तकाचे एकूण सात भाग लेखकाने लिहिले असून प्रत्येक भागात आपल्याला नाविन्यपूर्ण अशी माहिती मिळते.हे पुस्तक वाचल्यानंतर मानवी जीवन हे गूढ शक्तीनी कसे भरलेले आहे. याचे ज्ञान होते. अदृष्ट सृष्टीची माहिती देणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.


*महत्वाचे मुद्दे :-*


1.त्यांच्या म्हणण्यानुसार अदृश्य सृष्टीमध्ये चांगले.वाईट व मध्यम असे तीन प्रकारचे आत्मे वावरत असतात. मनुष्य आपल्या कर्मानुसार जीवणात फळ भोगत असतो.


2. मनुष्याने माणुसकी सोडून कधीच वागू नये. ईश्वर भक्ती सोबतच दान व परोपकार ही करावे जेणेकरून त्याचे प्रारब्ध शुद्ध होईल.


3. ईशा, द्वेष, मस्तर करणाऱ्या मनुष्यांच्या भोवती पिशाच्च शक्‍तींचा वावर असतो.


4 आपल्या घरचे वातावरण नेहमी शुद्ध राहण्यासाठी होम हवन करावे. ध्यान साधना, जप, व नामस्मरण याचे अद्भुत परिणाम मनुष्याच्या आयुष्यात होत असतात. यज्ञामुळे घरात वातावरण शुद्ध होऊन देवदेवतांचा वास आपल्या घरात होतो ज्यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होते नैराश्य निघून जाते.


5. ज्या वास्तूमध्ये तीन वर्षे दिवा लावला जात नाही तेथे पिशाच्च शक्तींचा वावर होतो त्याचे दुष्परिणाम आजूबाजूच्या लोकांना जाणवू लागतात. तंत्रविद्या त्याचे दुष्परिणाम पिशाच्च, योगसाधना, ईश्वरभक्ती, जन्म मृत्यू रहस्य. ध्यानसाधने त आपल्याला येणारे अद्भुत अनुभव….


यासारखे अनेक मुद्दे या पुस्तकात लेखकाने मांडले आहे. मला तर हे पुस्तक खूपच आवडलं हे वाचताना मी अक्षरश मोहुन गेली होती. काही काही उपाय असे होते की ते करताना भीती वाटते.🙄 परंतु जे सोपे आहे ते मी नक्कीच केले जसे की होम(यज्ञ) व नामस्मरण खरंच त्यामुळे घरातील वातावरणात मला खूप फरक जाणवला….


*ज्यांना ध्यानसाधना ,ईश्वरभक्ती,प्रारब्ध ,कर्म भोग, नामस्मरण या सर्व विषयांबद्दल जाणून घेण्याची उस्तुकता आणि आवड असेल त्यांनी हे पुस्तक नक्कीच एकदा वाचावे ही विनंती.….🙂🙏*


*Cp*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi