Sunday, 14 July 2024

नेस्कोत रंगला गीत गायनाचा कार्यक्रम; दिग्गज गायकांनी केले भक्तीगीत सादर

 नेस्कोत रंगला गीत गायनाचा कार्यक्रम;

 दिग्गज गायकांनी केले भक्तीगीत सादर

 

            मुंबई, दि.13 : मुंबई महानगर प्रदेशातील 29 हजार कोटींहून अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात पार पडला. या कार्यक्रमापूर्वी प्रसिद्ध मराठी गायकांच्या देशभक्तीभावगीतांनी कार्यक्रमात रंगत आणली होती.

            राधा ही बावरीगालावर खळी या प्रसिद्ध गाण्यांचे गायक स्वप्निल बांदोडकरधर्मवीर चित्रपटातील भेटला विठ्ठल’ या गाण्याचे गायक मनिष राजगीरेगायिका मुग्धा कराडेकविता राम यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले होते. या गीत गायनाच्या कार्यक्रमामुळे समारंभात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

            मराठी कलाकारांच्या गीत सादरीकरणामुळे मुंबईतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संमारभ मुंबईकरांच्या स्मरणात राहण्यासारखा होता. गीतगायन कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत यांनी केले.

००००

 

 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi