Friday, 7 July 2023

अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवावे की भांड्यात?*

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

*अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवावे की भांड्यात?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


आता घरोघरी प्रेशर कुकर आले आहेत. पण मला आठवते, २५ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरात प्रेशर कुकर आला तेव्हा माझ्या आजोबांनी, "छे ! प्रेशर कुकर मधल्या डाळ-भाताला काही चवच नसते!" असे म्हणून स्वत:साठी वेगळा भात आणि वरण करायला लावले होते. आजही काही लोकांना तसे वाटते.


आहारशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने त्यातील पोषक पदार्थाचा नाश होत नाही. प्रेशर कुकर मध्ये अन्न लवकर शिजत असल्याने अन्नावर उष्णतेचा परिणाम जास्त होत नाही व त्यातील जीवनसत्त्वे वगैरे टिकून राहतात. दाबाखाली पाणी उकळवल्यास पाण्याचा उत्कलनबिंदू कमी होतो व त्यामुळे पाणी लवकर उकळायला लागते व अन्न लवकर शिजते.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अन्न लवकर शिजत असल्याने इंधनही कमी लागते. आपल्या देशात कित्येक घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक करतात. प्रेशर कुकरच्या वापराने सरपण, कोळसा, रॉकेल वा गॅस या इंघनांचा वापर कमी होईल. यामुळे इंधनाची बचत तर होईलच, पण हवेचे प्रदूषणही कमी होईल. 


एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, ती म्हणजे काहीजण प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवून झाल्यानंतर कधीकधी उतू जाऊन खाली पडणारा भात, डाळ वगैरे फेकून देतात. भातावरचे वा डाळीवरचे पाणी काढून टाकतात. हे अत्यंत चुकीचे आहे. कारण या पाण्यात अमिनो आम्ले व जीवनसत्त्वे असतात.


हो एक सांगायचे राहिलेच! सुरुवातीला प्रेशर कुकरच्या भात-वरणाला नाक मुरडणाऱ्या आमच्या आजोबांना आज मात्र प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले भात-वरणच लागते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi