दापोली-हर्णे मार्गावर अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोकमृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
मुंबई दिनांक २६: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी याविषयी माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले.
या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत.जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आ
हेत.
No comments:
Post a Comment