Monday, 26 June 2023

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

                                             घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

 


मुंबई, दि.२६ :  पहिल्या पावसामुळे घाटकोपर पूर्व येथील राजावाडी कॉलनीमध्ये नुकतीच एक जुनी तीन मजली इमारत कोसळून दुर्घटनाग्रस्त झाली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची व जखमींची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट घेतली आणि दुर्घटनास्थळाची पाहणी केली. शासनातर्फे  सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी करून या  अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी  दिले. 

            "झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. याबाबतची सर्व तपासणी सुरु आहे. यासाठी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे" असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

        २५ जून रोजी झालेल्या या अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीराष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करते वेळी देखील पालकमंत्री  श्री. लोढा घटनास्थळी उपस्थित होते. अपघातानंतर सुमारे १२ तासापेक्षा जास्त काळ बचाव कार्य सुरु होते.

  

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi