Friday, 24 March 2023

बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण यांचा वार्षिक स्नेहसंमेलन




 आई डे केअर संस्था* संचलित बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण यांचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



राजू मोहिते ( पेण)- नुकतेच दि. 21 मार्च 2023 रोजी आई डे केअर संस्था संचलित बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी निवासी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण यांचा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने आणि गॅलेक्सी सरफेक्टन्स लि. तळोजा हेड (सीएसआर) श्री.आदर्श नय्यर आणि सेशु सांभा मूर्ती, सिपला कंपनीच्या उल्का धुरी, माने मॅडम, अहिल्या मंडळाच्या सर्वेसर्वा वासंती देव, लक्ष्मी राजू पिचीका, नेहा प्रकाश झावरे यांच्या हस्ते बौद्धिक दिव्यांग मुलांचे सांस्कृतिक स्नेहसंमेलनाची दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. सुरुवातील विद्यार्थ्यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.


आदर्श नय्यर या प्रसंगी बोलताना म्हणाले कि यां विशेष मुलांनी सांस्कृतीक कार्यक्रम करणे आणि त्यांच्याकडून विविध कलागूण करवून घेणे हे विशेष मुलांचे शिक्षकांचे कौत्युक करण्यासारखे आहे.  या वेळी गॅलेक्सी सरफेक्टन्स लि चे सेशु सांभा मूर्ती, सिपला कंपनीच्या उल्का धुरी यांनी ही मनोगत व्यक्त केले.


विशेष विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर बहारदार नृत्ये सादर केली. पाहुण्यांसमोर अनिकेत केसकर, नंदा दिघे आणि सुयोग पाटील यांनी सोलो गीते सादर केली. चेतन पाटील आणि आर्या मोरे या विद्यार्थ्यांनी एक द्वंद्व गीत सादर केले. त्यानंतर संस्थेची आणि वर्गाची माहिती व्यावसायिक वर्गाच्या उपमुख्याध्यापिका सौ.विद्या दीपक खराडे यांनी वर्गवारीनुसार पाहुण्यांसमोर मांडण्यात आली. नंदा दिघे या विद्यार्थिनीच्या बहिणीने प्रेक्षकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. 


विशेष मुलांनी भाग घेतलेले नाटक


 गोंद्या आला रे  याचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांच्या समोर सादर केले.  सर्व उपस्थितांनी विशेष मुलांनी सादर केलेल्या नाटकाला शाब्बासकीची थापही  मिळवली. 


सूत्रसंचालन नृत्य शिक्षिका सौ. वेदिका मोडक यांनी केले. या कार्यक्रमासाठी अहिल्या मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी गाडगीळ रोटरी क्लब ऑफ पेण ओरायनच्या अध्यक्षा डॉक्टर सोनाली वनगे, डॉक्टर मानसी कदम, डॉक्टर नीता कदम,डॉक्टर लता परांजपे,रोटरी क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा सौ.मधू निकम, एडवोकेट मंगेश नेने, एडवोकेट शुभांगी झेमसे, इनरव्हील क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा तन्वी हजारे आणि सदस्या, सौ ज्योती वाघ कनिष्ठ  शिक्षण विस्तार अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण) योगा ग्रुपच्या सर्व सदस्य किशोर म्हात्रे सिबर्ड स्पेशल स्कूलच्या प्रिन्सिपल पल्लवी परदेशी लिटिल एंजल स्कूलच्या प्रिन्सिपल प्रीता कारखानीस, विशेष मुलांचे पालक,  विद्यार्थी- शिक्षक उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे आभार श्री महेंद्र भार्गव मोहिते यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

👇 फोटो

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi