Saturday, 11 March 2023

सर्व बँकांना शेतकऱ्याची पिक विमा संदर्भातील होल्ड केलेली खाते नियमित करण्याचे आदेश वसंत मुंडे

 सर्व बँकांना शेतकऱ्याची पिक विमा संदर्भातील होल्ड केलेली खाते नियमित करण्याचे आदेश वसंत मुंडे   


पुणे (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात खरीप 2022 चा पिक विमा बजाज आलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत 12 कोटी 35 लाख 13 हजार 358 रुपये खात्यात वर्ग नियमानुसार 12883 शेतकऱ्यांच्या पिक विमा ज्या त्या बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला म्हणून विमा कंपनी तात्काळ सर्व शेतकऱ्यांची खाते होल्ड करण्यासंदर्भात बँकेला कळविले त्यामुळे शेतकऱ्याची दैनंदिन व्यवहार ठप्प झाले सर्व स्तरात शेतकरी अडचणीत आल्यामुळे ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार दाखल केली. बीड जिल्हा सह खरीप व रब्बी पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये 2019 पासून महाराष्ट्रातील सर्व पिक विमा कंपनीने लोकप्रतिनिधी व अधिकार्‍या बरोबर टक्केवारीचे व्यवहार करून पिक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसने नेते वसंत मुंडे यांनी केला . खरीप 2022 चा चुकून पिक विमा पडला असे निदर्शनास दाखवून विविध बँकेच्या खात्यामध्ये शेतकऱ्याचे पीक विम्याचे खाते गोठविण्याच्या पत्र विमा कंपनीने बँकांना देऊन शेतकऱ्याचे वैयक्तिक व्यवहार ठप्प करण्यासाठी बँक व पिक विमा कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून कृषी आयुक्त व मुख्य सांख्यिकी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ला नियोमोचीत कारवाई करून अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याचे देण्यात आल्यामुळे दिनांक 10 मार्च 2023 ला विमा कंपनीकडून व कृषी आयुक्त कार्यालयाकडून शासनाकडे शेतकऱ्याची गोठवलेली खते नियमित करण्यासंदर्भात सर्व बँकांना आदेश पारित केल्याची माहिती काँग्रेसने ते वसंत मुंडे यांनी दिली .

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi