Saturday, 15 October 2022

नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर अंधेरी

 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

            मुंबईदि.15 :- भारत निवडणूक आयोगाने 166 - अंधेरी पूर्व’ विधानसभामतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

            ही सार्वजनिक सुट्टी 166 - अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतीलत्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रमबँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

            या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावायासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.

(क्र. मुंउजि/प्रमाक/वा/003)

 

000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi