खांदा (suvichar)
*मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.....*
*पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला.* "यापेक्षा" *किती जीवंत माणसांना हात दिला* यावर *आपली माणूसकी ठरत असते.*
*_एखादा माणूस मेलेला आहे हे कळताच धाऊन जाणारी माणसे ,_*
*_तो जिवंत असताना, अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत.......??_*
*खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते , कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत ......*
आजकालच्या या खोट्या दिखाव्याच्या शर्यतीत, *तु मोठा की मी मोठा* ही क्षणभंगुर श्रीमंती दाखविण्यापायी,*माणुस माणसाला, आपल्या नात्याला विसरत चाललाय,* म्हणुनच *जिवंतपणी, जिवंत माणसासाठी, जिवंत असणाऱ्या व अडचणीत सापडलेल्या, एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या.*
*_मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल........._*
No comments:
Post a Comment