Monday, 12 September 2022

कुष्ठ, क्षय रुग्ण शोध मोहीम

 लवकर निदान.... लवकर उपचार..

राज्यात आजपासून कुष्ठक्षय रुग्ण शोध मोहीम

 

            मुंबई दि. 12 : संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम प्रभावीपणे राबवावीअशा सूचना आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज दिल्या. कुष्ठ आणि क्षय रोगांचे लवकर निदान होऊन लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहेअसेही त्यांनी सांगितले.

            राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठ रोग आणि क्षय रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ रामास्वामी एन यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या.

            आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीस आरोग्य संचालक डॉ. साधना तायडेसंचालक डॉ. नितीन अंबाडेकरसहसंचालक डॉ. आर. एस. आडकेकरउपसंचालक डॉ. कैलास बावीस्करअलर्ट इंडिया संस्थेचे डॉ. व्हिन्सेंट ॲथोनीबॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे डॉ. विवेक पैमहाराष्ट्रजागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. रचना विश्वजीतकुष्ठपीडित संघटना सचिव अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.

कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियानाबाबत

राज्यात 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियान सुरू करण्यात येणार आहे.

याअंतर्गत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

राज्यातील सुमारे पावणे दोन कोटी घरांना भेटी पथकाद्वारे दिल्या जाणार आहेत.

यासाठी सुमारे 65 हजार पथके तयार करण्यात आली आहेत. येत्या चौदा दिवसात सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल.

ग्रामीण भागातील 20 तर शहरी भागातील 25 घरांना दररोज भेटी दिल्या जातील.

लवकर निदान व लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

                           कुष्ठरोगाची लक्षणे

            त्वचेवर फिकटलालसर चट्टा येणेत्वचेवर गाठी होणेकानाच्या पाळ्या जाड होणेभुवयांचे केस विरळ होणेडोळे पूर्ण बंद करता न येणेतळहातावरतळपायावर मुंग्या येणेमनगटापासून हात आणि घोट्यापासून पाय लुळा पडणेत्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणेहात पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे.

क्षयरोगाची लक्षणे

            दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकलातापवजनात लक्षणीय घट होणेथुंकी वाटे रक्त येणेमानेवर गाठ येणे.

०००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi