Tuesday, 20 September 2022

लग्न म्हणजे काय असतं

 लग्न म्हणजे नेमकं काय ?

*

'लग्न' हे सुंदर जंगल आहे.

जिथे 'बहादुर वाघांची' शिकार,

मोहक हरिणी करतात...

                    

 लग्न म्हणजे -

'अहो ऐकलंत का ?' पासुन ते

 'बहिरे झालात की काय ?'

पर्यंतचा प्रवास...

                    

लग्न म्हणजेच -

'तुझ्यासारखे या जगात,

कुणीच नाही' पासून,

तुझ्या सारखे छप्पन 

बघितलेत' पर्यंतचा प्रवास... 

                 

लग्न म्हणजे -

'तुम्ही राहू द्या' पासुन ते

 'मेहरबानी करून तुम्ही तर 

राहुच द्या"' पर्यंतचा प्रवास ... 

                

लग्न म्हणजे -

'कुठे होती ग माझी राणी' पासून तर

'कुठे मेली होतीस' पर्यंतचा प्रवास...

                  

लग्न म्हणजेच-

'तुमचे नशीब मी भेटले तुम्हाला" पासुन ते

'मेलं माझंच नशीब फुटकं, 

तुम्ही मला भेटलात" पर्यंतचा प्रवास ...

 😊😊

थोडक्यात काय तर -

वैवाहिक जीवन हे कश्मीर सारखे आहे,

सुंदर तर आहेच,  

परंतु दहशत पण आहे ...


 😝😆😅😂

(हे लिहिल्यापासून लेखक फरार आहे.)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi