Saturday, 17 September 2022

अध्यात्म

 *कडू गोळी चावली नाही गिळली जाते,*

*तसेच..*

*जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये,* 

*त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल❗*

*प्लेट भर शिरा खाताना आपल्याला रवा, काजु, बदाम दिसतात.*    

*पण ज्यामूळे शिरा गोड झाला आहे,*

*ती साखर मात्र कूठेच दिसत नाही.*

*लक्षात ठेवा काही माणसे* *आपल्या आयूष्यात अशीच साखरे सारखी असतात,*

*पण ती कधीच दिसत नाहीत,*

*मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयूष्य गोड होते❗*

*आनंद पैशांवर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो.*

*एक मुलगा फुगा घेऊन खूश होतो.*

*तर दुसरा तो विकून*

*आणि तिसरा तो फोडून खूश होतो❗*

*मंदिरातील घंटेला आवाज नाही. जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही. कवितेला चाल नाही. तोपर्यंत तुम्ही ती गात नाही. त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीत. मन वळू नये, अशी श्रद्धा हवी. निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी. सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी. कधी विसरू नये अशी नाती हवी❗*

*काळ्या खोलीत काळी मांजर शोधणे म्हणजे तत्त्वज्ञान.*

*काळ्या खोलीत काळी मांजर शोधणे जी की तिथे नाहीये म्हणजे अध्यात्म.*

*काळ्या खोलीत काळी मांजर शोधणे जी तिथे नाहीये तरीही सापडली म्हणून ओरडणे म्हणजे धर्म.*

*काळ्या खोलीत काळी मांजर प्रकाश लावून शोधणे म्हणजे विज्ञान❗*

*जीवनांत वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत. ते आधी परिक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात❗*

*शब्दकोडी सोडवताना बुद्धीची कसोटी लागते,*

*तर आयुष्याची कोडी सोडवताना सहनशक्तीची कसोटी लागते❗*

*ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच माणसे आपली.*

*बाकी फक्त जग आहे‼️*

**🌹🌿🌾

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi