Monday, 5 September 2022

श्रद्धांजली

 ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली



                                     कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या जाण्याने हानी



मुंबई, दि. ४:- ' उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरूण, कर्तबगार उद्योजकाचे जाण्याने उद्योग विश्र्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, 'टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. ते  केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. सायरस मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


                                                                       000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi