*✍️ _मैत्री_‼️*
*_______________*
*मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ती बोलून दाखवू नका !*
*कारण कोणत्याही बाटलीचा सील आणि दोस्तांचा दिल एकदा तोडला की विषय संपला !*
*मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत*
*नाहीत❗*
*"मित्र" नावाची ही दैवी देणगी जीवापाड जपून ठेवा,*
*कारण..*
*जीवनांतील अर्धा गोडवा हा मित्रांमुळेच असतो❗*
*कोणीतरी विचारले मित्रांमध्ये एवढे काय विशेष नातेवाईकांपेक्षा..*
*त्यांना सांगितले,*
*मित्र हे फक्त मित्र असतात..*
*त्यात सख्खे, चुलत, मावस, सावत्र असं काही नसते. ते "थेट" मित्र असतात❗*
*“मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहुनही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत”❗*
*प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही.*
*काही दुखणी कुटुंब आणि मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि खिदळण्यानेही बरी होतात❗*
*माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात "सावली म्हातारपणात "शरीर"*
*आणि..*
*आयुष्याच्या शेवटच्या काळात "पैसा" कधीच साथ देत नाहीत साथ*
*देतात ती फक्त आपण जोडलेले "जवळचे मित्र"❗*
*म्हातारपण केव्हा❓❓*
*मित्र बोलवित आहे, पण तुम्हाला जावेसे वाटत नसेल तर समजा की तुम्ही म्हातारे झालात. म्हातारपण येवू न देणे आपल्या हातात आहे.*
*मित्रांसोबत रहा व* *आनंदात*
*जीवन जगा* ‼️
No comments:
Post a Comment