सहा चित्रांचा गिलावा पडला, एकाचा का नाही??
- अजिंठ्यातील रहस्ये उलगडण्याची संधी
इसविसन ४६७. अजिंठ्यातील एकही लेणं पूर्ण झालं नव्हतं. तरीही बौद्ध भिक्खू या खोल्यांमध्ये वास्तव्याला यायला सुरुवात झाली. पण या खोल्यांना दारे नव्हती. आजूबाजूला घनदाट जंगल होते. उंदीर, साप, विंचू, वाघ हे मुक्त संचार करत असणार. त्यामुळे आतून कडी लावून दार बंद करता येणे अत्यावश्यक होते. उत्साहाच्या भरात लेणीचे हे काम झाले खरे, पण दारे लावण्याची बाब ही बाब कोणाच्या लक्षातच आली नव्हती. यावर उपाय सापडला ४६८ मध्ये. काय होता तो उपाय...??
...
अजिंठ्यातील लेणे क्रमांक २. त्याच्या छतावर प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत अजिंठ्याची सर्वाधिक सुंदर आणि लक्षवेधी अशी सात वर्तुळांची मालिका रंगवली आहे. यातले वैविध्य, नाजूक कलाकुसर आणि रंगसंगती अचंबित करणारी आहेत. या वर्तुळांच्या केंद्रस्थानी छिद्रे आहेत आणि छिद्रांच्या अवतीभवतीचा गिलावा आहे. इथल्या सात पैकी सहा वर्तुळांच्या भोवतीचा गिलावा पडलेला आहे. पण शेजारच्या लेणे क्रमांक १ मध्ये मात्र छतावरचा गिलावा अखंड आहे, कुठेही बारकासा टवकाही गेलेला नाही... असे का??
...
घारापुरीची प्रसिद्ध लेणी. ती आठव्या शतकातील असल्याचे मानले जात होते. पण हे कोणी व कसे ठरवले? अजिंठ्यात ‘पर्शियन एम्बसी’ या नावाने ओळखले जाणारे भित्तीचित्र आहे. या ऐतिहासिक पर्शियन शिष्टमंडळाची तारीख इसविसन ६२५ अशी ज्ञात असल्यामुळे अजिंठा लेण्यांचा काळ सातवे शतक, असे विद्वानांचे मत होते. पण नंतर हे चित्र म्हणजे पर्शियन एम्बसी नव्हे हे पुरातत्वज्ञांना जाणवू लागले, डीटर श्लिंगलॉफ या जर्मन विद्वानाने हा (गैर)समज पूर्णपणे निकालात काढला... हे नेमके कसे घडले??
...अजिंठा लेणीत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत. ती समजून घेतली तर अजिंठा लेणी लक्षात येईल आणि तिचा नेमका अर्थही समजेल.
ती समजून घेण्याची संधी भवताल उपलब्ध करून देत आहे. म्हणूनच, २००० वर्षे जुनी लेणी उलगडणारी इको-टूर...
...अजिंठा लेणीत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत. ती समजून घेतली तर अजिंठा लेणी लक्षात येईल आणि तिचा नेमका अर्थही समजेल. ती समजून घेण्याची संधी भवताल उपलब्ध करून देत आहे. म्हणूनच, २००० वर्षे जुनी लेणी उलगडणारी भवताल इको-टूर...
(अजिंठ्यातील चित्रांचे अभ्यासक)
संपर्कासाठी :
bhavatal@gmail.com / 9545350862
(माहिती संदर्भ : शुभा खांडेकर)
भवताल
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
.jpg)
No comments:
Post a Comment