Saturday, 23 July 2022

अभिवादन

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात टिळकांचे स्मरण हे कर्तव्

            मुंबई, दि. २३ : "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

            मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार शहाजी (बापू) पाटील, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या (प्र.सु.व र.व.का.) अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

            'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगत लोकमान्य टिळक यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांचा हुंकार भरला. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन,' असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

0000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकमान्य टिळक यांनाजयंतीनिमित्त अभिवादन

            मुंबई, दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

            सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000

राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन.

            मुंबई, दि.२३ : लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्यपालांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली तसेच स्मृतीस्थळाजवळच्या जागेत वृक्षारोपण केले.  

            लोकमान्य टिळक यांचे वृत्तपत्र बंद केले गेले. त्यांना भारतापासून हजारो मैल दूर मंडाले येथे तुरुंगवासात ठेवले गेले. तेथे त्यांनी 'गीता रहस्य' हा गीतेतील कर्मयोगावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. गीता केवळ सन्यास वा भक्तीसाठी नाही, तर कर्माचा पुरस्कार करते असे सांगणारा टिळकांचा कर्मयोग अतुलनीय आहे. त्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.  

            'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' हा स्वराज्याचा मंत्र देणारे टिळक हे पहिले नेते होते. महात्मा गांधींसह अनेक नेत्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा दिला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे सांगताना लोकमान्यांचे जीवन कार्य नव्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असे राज्यपालांनी सांगितले. 

            कार्यक्रमाला लोकमान्य टिळक स्वराज्यभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi