Saturday, 9 July 2022

जय महाराष्ट्र

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

महाराष्ट्र सदनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन

नवी दिल्ली, दि. 9 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदन परिसरातील महापुरुषांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

       मुख्यमंत्री श्री. शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi